भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पती- पत्नीचा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनीही स्वतःला जाळून घेतले. ही घटना भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात मध्यरात्री घडली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळं तीन वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे. परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त होत आहे.
कारध्यातील महेंद्र सिंगाडे (38) आणि त्यांची पत्नी मेघा (30) यांच्यात शनिवारी मध्यरात्री वाद झाला. हे भांडण खूपच विकोपाला गेले. तुही नको नि मीही नाही, असं म्हणून महेंद्रने आधी स्वतःवर रॉकेल ओतले. नंतर पत्नी मेघावर रॉकेल ओतले आणि पेटवून घेतले.
या योजनेत दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
महेंद्र सिंगाडे हा ग्राम टाकेपार येथील ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेट या पदावर कंत्राटी कर्मचारी होता.महेंद्र सिंगाडे यांच्यावर किरकोळ कर्ज असल्याने तो चिंतेच्या भरात दारूच्या आहारी जाऊ लागला होता. यामुळे घरी पती- पत्नी यांच्यात वाद वाढत गेले. शनिवारी रात्री ९.३० च्या दरम्यान पती-पत्नी यांचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाले गेले की पती महेंद्र सिंगाडे यांनी स्वतःवर व पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.