जळगाव – येथील काव्यरत्नावली चौकापासून काही अंतरावर असलेल्या जाणता राजा जिम्नॉशियम शेजारी राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून वीट मारून जखमी करीत गर्दी जमत असल्याचे पाहून . बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन व पाकिटातील दहा हजारांची रोकड घेऊन पसार झाले . याबाबत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठून आपली आपबिती कथन केली . मात्र पोलिसांनी असहकार्यची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली . मात्र तत्परता न दाखविता आरोपींचा शोध त्वरित घ्यायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त होत आहे . याबाबत माहिती अशी कि ,
काव्यरत्नावली चौकापासून काही अंतरावर असलेल्या जाणता राजा जिम्नॉशियम शेजारी शासकीय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे हे जेवण आटोपल्यानंतर त्यांच्या मोटारसायकल (क्र.एमएच १६, बीई ४४५८) ने आईस्क्रिम घेण्यासाठी गेले होते. आईस्क्रिम घेऊन घराकडे परतत असताना छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी काहीही कारण नसताना दहीवडे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एका तरुणाने वीट उचलून त्यांच्या पाठीवर व मानेजवळ मारून त्यांना दुखापत केली. मारहाणीत दहीवडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व खिशातील १० हजार रुपये या तरुणांनी हिसकावून नेले.मात्र हा प्रकार घडत असताना गर्दी जमा झाल्याचे पाहून अज्ञात तरुणांनी पलायन केले . याबाबत दहीवडे यांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली . पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली . मात्र गुन्हा दाखल झाला नसल्याने दहीवडे यांनी रात्री १२ वाजता पोलीस स्टेशन गाठले मात्र त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ का ?
जबरी लूट करून अज्ञात दुचाकीवर आलेल्या तरुणांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाला मारहाण करून पळ काढला मात्र पोलिसांनी कुठलीही तत्परता ना दाखवता गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे . दरम्यान दहीवडे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली असता दुपारी पोलिसांनी जबाब नोंदविल्याचे सांगून अद्याप गुन्हा दाखल न केल्याचे त्यांनी सांगितले . त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.