मुंबई :: सध्या सोन्याचांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर 48000 रुपये प्रति तोळापेक्षा कमी आहेत. आज, फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX वर सोने 0.06 टक्क्यांनी घसरून 47,659 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. त्याचवेळी, आजच्या व्यवहारात चांदी 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर अर्थात 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 47,543 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात आता सोन्याचे दर जवळपास 8541 रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त आहेत.
घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.















