मुंबई : ठाणे-दिवा पाचव्या सहाव्या मार्गासाठी ठाणे-कळवादरम्यान धीम्या मार्गावर आज, शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून ते उद्या रविवार आणि सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत ३६ तासांचा ब्लॉक मध्य रेल्वेकडून घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान ३९० लोकल फेऱ्या आणि डेक्कन, डेक्कन क्वीन, पंचवटी, जनशताब्दी, सेवाग्राम, राज्यराणी यांसह एकूण १८ मेल-एक्स्प्रेसच्या फेऱ्या रद्द होणार आहेत.
ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत. धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गवरून वळविण्यात येतील. यामुळे लोकल फेऱ्या १० मिनिटे विलंबाने धावतील. या स्थानकांतील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकातून प्रवास करण्याची मुभा असेल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिका आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांना अतिरिक्त बस सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शुक्रवार-शनिवारी रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस
– १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
– १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
– १७६११ नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
शनिवार-रविवार रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस
– ११००७/११००८ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
– १२०७१/१२०७२ मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
– १२१०९/१२११० मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
– ११४०१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस
– १२१२३/१२१२४ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
– १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
– १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस
– १११३९ मुंबई-गदग एक्स्प्रेस
– १७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
रविवार-सोमवार रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस
– ११४०२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
– १११४० गदग-मुंबई एक्स्प्रेस