Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा? काँग्रेस विश्लेषण करणार

najarkaid by najarkaid
June 3, 2019
in राजकारण
0
निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा? काँग्रेस विश्लेषण करणार
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली- लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळालं तर काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता हा पराभव काँग्रेसच्या त्रुटींमुळे झाला आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे याची शहानिशा काँग्रेस करणार आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला 303 तर काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या. एकेकाळी 300हून अधिक जागा जिंकणार्‍या काँग्रेसचा इतका दारूण पराभव का झाला याचं प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्लेषण काँग्रेस करणार आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक 20 मागवण्यात आला आहे.
फॉर्म क्रमांक 20मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मतं मिळाली याची तपशीलवार माहिती दिली असते. प्रत्येक मतदानकेंद्रातील परिक्षेत्रात मतदानाआधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मतं याची चाचपणी काँग्रेस करणार आहे. जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मतं कमी मिळाली असतील तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदानकेंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच विविध राज्यांमध्ये ईव्हीएमनुसार होणार्‍या मतमोजणीत घोटाळा होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या तपासणीत काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल व साकेगावात वादळी पाऊस, जळगावात ढगाळ वातावरण

Next Post

गावांना आर्थिक सक्षम करण्याचा सरपंचांचा निर्धार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
गावांना आर्थिक सक्षम करण्याचा सरपंचांचा निर्धार

गावांना आर्थिक सक्षम करण्याचा सरपंचांचा निर्धार

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us