नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे आज (सोमवार) म्हणजेच 20 डिसेंबरच्या सकाळी सोन्या-चांदीच्या दोन्ही किमती गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवसाच्या तुलनेत कमी झाल्या आहेत.
आजचे दर –
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 20 डिसेंबरच्या सकाळी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा दर 54 रुपयांनी खाली आला आहे. यासह, 24 कॅरेट सोन्याचा दर 48737 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे, जो गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 17 डिसेंबर रोजी 48791 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याचवेळी चांदीच्या दरात 568 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ९९९ शुद्धतेची चांदी सोमवारी सकाळी स्वस्त झाली असून ६१२४३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
आजचे सोने-चांदीचे दर
सोन्या-चांदीच्या किंमती दिवसातून दोनदा जारी केल्या जातात. सोमवारी जाहीर झालेल्या किमतींनुसार, 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 48542 रुपये, तर 916 शुद्धतेचे सोने 44,643 रुपयांना विकले जात आहे. 750 शुद्ध सोन्याचा भाव 36553 रुपये तर 585 शुद्ध सोन्याचा भाव 28511 रुपये नोंदवला गेला आहे.