भारतीय टपाल विभागामार्फत मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन विहित नमुन्यात अर्ज सबमिट करू शकतात. या पदांच्या भरतीसाठी बिहार मंडळाकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. अर्ज 13 डिसेंबर 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वी सबमिट केले जाऊ शकतात.
एकूण पदांची संख्या – 60 पदे
रिक्त पदांचा तपशील:-
1) PA – 31 पदे
2) SA – 11 पदे
3) पोस्टमन – 5 पदे
4) MTS – 13 पदे
शैक्षणिक पात्रता:
पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंटसाठी:- मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी पास किंवा समकक्ष पात्रता. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
पोस्टमन/मेल गार्डसाठी:- मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान. नियुक्ती पत्र जारी करण्यापूर्वी उमेदवारांना मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्थेतून किमान 60 दिवसांच्या कालावधीचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
MTS – 10वी पास. स्थानिक भाषेचे म्हणजेच हिंदीचे ज्ञान.
अर्ज फी :
अर्जाची फी 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
इतका मिळेल पगार?
पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक – रु. 25500-81100 प्रति महिना
पोस्टमन – 21700-69100 रुपये प्रति महिना
MTS – रु 18000-56900 प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२१
याप्रमाणे अर्ज करा
पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. तुम्ही तुमचा अर्ज 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी “सहाय्यक संचालक (भरती), 5 वा मजला, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, बिहार सर्कल, पाटणा – 800001” वर पाठवू शकता.