राज्यावर अद्यापही अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. राज्यातील काही भागात २९ आणि १ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं असून जळगाव जिल्ह्यावर देखील अवकाळी पावसाचं संकट असून येत्या १ डिसेंबर ला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवर आसमानी संकट…
पावसाळा संपल्यावर सुद्धा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेकऱ्यांचे अतोनात नुकसान होतं आहेत हाता तोंडाशी आलेलं पिकं अवकाळी पावसानं खराब होतं असल्याने शेतकऱ्यांवर आसमानी संकट आलं आहेत. अवकाळी पावसाने भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने भाजीपाला कमी उपलब्ध झाल्याने भाजीपाला महागला आहे.
राज्यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी…
हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, १ डिसेंबर ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील तापमान वाढलं, थंडी गायब
अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवडय़ात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आणि आकाश अंशत: ढगाळ झाले आहे. या काळात कोकणात काही भागांत पाऊस झाला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यामुळे पावसाळी स्थिती दूर झाली नाही.
२९ नवंबर ते १ दिसंबर दरम्यान कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची वाढ अपेक्षित आहे . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY… भेट द्या pic.twitter.com/Uf49UA9hsf
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 27, 2021










