जळगाव : भरधाव डंपरच्या धडकेत रुग्णालयात अधिपरिचारिका असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक घडली आहे. प्रेरणा देविदास तायडे असे मृत महिलेचे नाव आहे.
जळगाव – भुसावळ दरम्यान महामार्गावर तरसोद फाट्यानाजीक एमएच १९ वाय-७७७३ क्रमांकाच्या डंपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यात प्रेरणा देविदास तायडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला दरम्यान, मृत महिला ही कंडारी ता. भुसावळ येथील रहिवाशी असून त्या रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून पोलिसांनी डंपरच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या अपघातामुळे अवैध वाळू आणि गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेत डंपरच्या पुढील चाकात दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.