जळगाव- येथील सुपूत्र असलेले डॉ.मयुर जैन यांनी मुंबईच्या जसलोक हॉस्पीटल मध्ये एका पेशंटवर हृदयातील झडपेवरील आव्हानात्मक दुर्मिळ मानली जाणारी शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्राद्वारे यशस्वीरित्या केली आहे.
आपले हृदय म्हणजे रक्ताभिसरण करणारा एक पंप असतो. त्याचे कार्य सुरळीत कार्य करण्यासाठी चार प्रकारच्या झडपा असतात. ऍबोटीक व्हाल्ह ही त्यातली एक अत्यंत महत्वपूर्ण झडप! काही व्यक्तींमध्ये वयोमानानुसार नीट काम करु शकत नाही, अशावेळी ती बदलावी लागते. ही झडप बदलण्यासाठी खुप मोठी चिर देऊन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीला व आयुष्याला धोका असतो. परंतु डॉ.मयुर जैन यांनी ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली त्यांची यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचे हृदय 35 टक्केच कार्यरत होते. परंतु डॉ. जैन यांनी कोणतीही जखम न करता टीएव्हीटी/टीएव्हीआर या आधुनिक तंत्राद्वारे ऍबोटीक व्हाल्ह ही अत्यंत महत्वाची झडपेवर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली.
डॉ. मयुर जैन यांच्या विषयी….
डॉ.जैन हे जळगावातील प्रसिद्ध फिजिशियन व रोटरी सेंट्रलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र जैन व सामाजिक कार्यकर्त्या सौ.नीता जैन यांचे सूपूत्र असून निष्णात डी.एम.कार्डिओलॉजीस्ट आहेत. त्यांनी शालांत परीक्षेपासून ते डी.एम.कॉर्डिओलॉजीस्ट परीक्षेत गुणवंता यादीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहेत. अमेरीकेतील क्लेव्हलॅड क्लिनिक हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतला आहे. अशा प्रकारचे अवघड अत्याधुनिक शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी अधिकाधिक नैपुण्य मिळविले आहे.