पावसाळा संपल्यानंतर आता राज्यात कडाक्याची थंडी पडायला सुरवात झाली असतांना थंडीत देखील पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३ दिवस ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं कडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागानं ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार येत्या १७ नोव्हेंबरच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल, आणि याचं बदलामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.तर राज्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
तसेच राज्यात १८ नोव्हेंबर पर्यंत राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
14-18 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता @RMC_Mumbai
17 Nov आसपास कमी दाबाचे क्षेत्र पू्र्व-मध्य अरबी समुद्रात, द.महाराष्ट्र-गोवा तटीय भागात निर्माण होण्याची शक्यता https://t.co/eAIy8vzk7e
– IMD pic.twitter.com/dsZIlE22RM— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 14, 2021