रत्नागिरी -जिल्ह्यातील संगमेश्वर, देवरूख, साखरपा परिसरात रात्री अडीच वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने रत्नागिरी जिल्हा हादरला असून एकाच महिन्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे हादरे बसले आहेत.रात्री अडी – तीनच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असल्याने भूकंपाचे धक्के जाणवताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान भूकंपाची धक्के बसत असतांनाचं नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली त्यामुळे या भागात जिवीतहाणी झाली नाही. तर या भूकंपाची तीव्रता चार रिश्टर स्केल असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे.