Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिवाळी उत्सवासाठी जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्या ‘या’ मार्गदर्शक सुचना

najarkaid by najarkaid
October 31, 2021
in Uncategorized
0
मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 31 – महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. आरएलपी-1021/प्र.क्र.247/विशा-१ब, दि. 27 ऑक्टोबर, 2021 अन्वये दिपावली उत्स्व 2021 सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या असून या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले आहे.

दीपावली उत्सवा दरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरीकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

दीपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणांवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढुन जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरीकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास करुन उत्सव साजरा करावा.

सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. Corona 2021/ C.R.366/Arogya-5, दि. 24/9/021 अन्वये ‘‘ब्रेक दि चेन’’ अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा- रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

मा. सर्वोच्च न्यायालय रिट पिटीशन (सिव्हील अपिल) क्र. 728/2015 (निर्णय दि. 23/10/2018) तसेच सिव्हील अपिल क्र. 2865-2867/2021द (निर्णय दि. 23/7/2021) मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होणाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील.

या सुचनांचे पालन न केल्यास सबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी परिपत्रकान्वये कळविले आहे.

00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात वाढणार घसादुखी, ‘या’ 9 देशी गोष्टींमुळे लगेच मिळेल आराम

Next Post

१ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमाचा तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
१ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमाचा तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

१ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या 'या' नियमाचा तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us