पाचोरा – येथील जुंटो क्लब तर्फे नवजीवन सुपर शॉप चे संचालक अनिल कांकरीया यांचे व्याख्यान नुकतेच पाचोरा शहरात संपन्न झाले. सुमारे एक तास चाललेल्या या व्याख्यानात अनिलभाई कांकरिया यांनी उपस्थितांना यशस्वी व्यवसायाचे सूत्र समजावून सांगितले.प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ज्युंटो टॉक या मार्गदर्शनपर व्याख्यानाला पाचोरा व भडगाव परिसरातील सुमारे दिडशे सदस्य उपस्थित होते.
पाचोरा भडगाव रोटरी क्लब अंतर्गत वाचन संस्कृती जोपासणाऱ्या रोटरी सदस्यांनी ज्युंटो क्लबची स्थापना केली असून या क्लब तर्फे दरमहा एका प्रेरणादायी पुस्तकाचे वाचन होऊन त्यावर चर्चासत्र घडवून आणले जाते. यावर्षी गणेशोत्सव यापासून दरमहा तज्ञ व्याख्याते बोलवून सदस्यांना ज्ञान समृद्ध करण्याची योजना निश्चित करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवजीवन सुपर शॉप चे संचालक अनिलजी कांकरीया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना अनिलभाई कांकरीया म्हणाले की,नवजीवन सुपर शॉप सुरू करण्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी २५० वेळा बँकेच्या चकरा मारून देखील त्या बँकेला आमचा बिझनेस कॉन्सेप्ट त्यावेळी न आवडल्यामुळे कर्ज देण्यास नकार दिला, निराशा आली परंतु थांबलो नाही. हे स्पष्ट करून जिद्दीने बिजनेस उभा केला अर्थातच हातात घेतलेले काम चिकाटीने करून ते पूर्ण करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की, कोणत्याही कामाची सुरुवात स्टेप बाय स्टेप करावी व हळु हळु व्यवसायाला मोठे करावे , आपल्या बिझनेस मधील सायन्स ओळखावे व त्याच अनुषंगाने आपण काय करू शकतो याची योजना आखून ताबडतोब कृती करावी. प्रत्येक विषय गणितामध्ये मांडावा उदा. एखादा विषयावर काम केल्यावर किती फायदा होईल किंवा नुकसान होईल हे आकडेवारीत लक्षात घेऊन समोरच्या व्यक्तीशी बोलावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यवसाय पुढे नेत असतांना सिंहावलोकन महत्वाचे आहे, बिझनेस रिव्ह्यू टाईम टू टाईम घ्यावा व त्यानुसार आपण कुठे आहोत याचे वास्तव कळते. यासाठी डाटा अँनालीसीस मंथली, क्वॉटरली किंवा वार्षिक करावे, त्यात कोणते बदल झाले आहे, याचा अभ्यास करून बिझनेस वाढीसाठी काय करायचं, यावर संबधित लोकाशी चर्चा करून निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले
ज्युंटो क्लब च्या कार्यपद्धतीचे कौतुक त्यांनी यावेली केले.पुस्तक वाचणे आवश्यक असते त्यामुळे आपण चंगल्या पद्धतीने व्यवसाय विस्तार करू शकतो असे त्यांनी सांगितले.
आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकाचं मार्गदर्शन सतत घेत राहणे व विविध कोर्सेस करून स्वतःला अपडेट करणे आजच्या काळाची गरज आहे. याशिवाय उद्योग सुरू करणे किंवा उद्योग वाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. एव्हढेच नव्हे तर, काळाच्या पुढे जाऊन विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते. असे ते म्हणाले.
आपल्या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो याचे नेहमी भान ठेवावे, व्यवसाय करताना एकाचे ( स्वतः चे) नुकसान झाले तर चालेल परंतू ५० लोकांचे नुकसान होता कामा नये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. व्यवसाय करताना सर्व प्रकारचे सरकारी कायदे पाळावे व सर्व टॅक्स (कर) १०० % भरावा असे आग्रही प्रतिपादन अनिल जी कांकरिया यांनी केले
एकत्र कुटुंब व्यवस्थेचे सभासद असलेले अनिलजी कांकरिया म्हणाले की, एकत्र कुटुब चालवण्याचा मुल मंत्र म्हणजे, आपण आपल्या मालमत्तेचे फक्त ट्रस्टी आहोत मालक नाही ह्या विचारातून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांशी संवाद व वागणे असावे असे ते यावेळी म्हणाले. रोहन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सुयोग जैन यांनी प्रास्ताविक केले तर बाळकृष्ण पाटील यांनी आभार मानले.