Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत-विभागीय आयुक्त

Editorial Team by Editorial Team
October 20, 2021
in जळगाव
0
शासनाचे उपक्रम ग्रामपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत-विभागीय आयुक्त
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- शासन सर्वसामान्य नागरीकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे. हे उपक्रम गावपातळीपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी महसुल विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. अशी सुचना नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.

येथील जिल्हा नियोजन सभागृहात विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गमे पुढे म्हणाले की, शासन शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ई फेरफार हे उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाची गावपातळीपर्यंत माहिती होण्यासाठी महसुल विभागाने गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करावे, सर्वांसाठी घरे हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गंत सन 2022 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी घरकुलांच्या बांधकामासाठी वाळूची कमतरता भासू नये, त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी जिल्ह्यात उभारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या अभियानातंर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांचे सर्व्हेक्षण करावे, प्रत्येक महसुल अधिकाऱ्यांने या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी स्वयंस्फुर्तीने प्रयत्न करावेत. भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी, यंदाचे वर्षे हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षे आहे. याचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. याचबरोबर जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेले जळगाव-भुसावळ तिसरी व चौथी रेल्वे लाईन, जळगाव- मनमाड तिसरी रेल्वे लाईन, राष्ट्रीय महामार्गसाठी आवश्यक असणारे भूसंपादनाचे काम प्राधान्याने पूर्ण करावेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हद्दपारीच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

शिवाय शासकीय वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आतापासूनच नियोजन करताना वाळू घाटांचा लिलाव करणे, शासकीय जमीन महसुल व गौण खनिज वसुली करणे, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देणे, शिवभोजन योजनेचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले असून गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात शासनाचे उपक्रम मिशन मोडवर राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आयुक्त श्री. गमे यांनी मतदार यादी पुन:रिक्षण कार्यक्रमाचे जिल्ह्यात चांगल्याप्रकारे काम सुरु असून याबद्दल यंत्रणेचे कौतुक केले, रोजगार हमी योजनेमार्फत सुरु असलेल्या कामावर स्थानिक मजूरांना कामे उपलब्ध करुन देणे, मनेरगातंर्गत अपूर्ण विंधन विहिरींचे कामे पूर्ण करणे, शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आधार सिडींग आदि विविध योजनामार्फत सुरु असलेले धान्य वाटप, शिवभोजन योजना, सुंदर माझे कार्यालय, झिरो पेडन्सी, महालेखापाल यांचेकडील प्रलंबित परिच्छेदांची पूर्तता, मतदार याद्या, राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय जमीन महुसल व गौण खनिज वसुली, वाळू घाटांचा लिलाव, सातबारा फेरफार, अर्धन्यायिक प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, महाराजस्व अभियान आदिंचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुचना केल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवी पास असलेल्यांना नोकरीची संधी ; IBPS मार्फत 4,135 पदांची मेगा भरती

Next Post

व्हाट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ लिहत तरुणाची आत्महत्या..!

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
व्हाट्सअप स्टेटसला ‘गुडबाय’ लिहत तरुणाची आत्महत्या..!

व्हाट्सअप स्टेटसला 'गुडबाय' लिहत तरुणाची आत्महत्या..!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us