पुणे येथील बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या कबड्डी पट्टू क्षितिजा अनंत व्यवहारे हिचा खून करणार्या संशयित ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत(वय २१, रा.सुखसागर नगर) याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी बारा तासातचं शोधून जेरबंद केले.
शुभम ने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन यश लॉन्स येथील मैदानावर आला. त्याने क्षितिजाला बाजूला बोलाविले. तिने तू येथे का आलास असे विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला असता याचं वेळी शुभमच्या साथीदाराने तिच्या पायावर वार केला. शुभम याने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार करत क्षितिजाचा निर्घृण खुन केला.तिच्या मैत्रिणी धावत तेथे आल्यावर त्यांनी खेळण्यातील पिस्तुलाने त्यांना धाक दाखवत हत्यारे तेथेच टाकून ते पळून गेले होते.
या घटने नंतर तिघेही जवळच्या झुडपात रात्रभर दडून बसले होते. बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना पहाटे या झाडाझुडपातून शोधून शुभमसह तिघांना पकडले आहे.