देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,”वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??” संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.. असं म्हणत जोरदार टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारनं दि.11 रोजी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती व तसा बंद देखील महाराष्ट्रात पाळण्यात आला असतांना अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत ‘ आज वसुली चालू है या बंद ‘असा उपरोधातत्मक टोला लागवला होता, या टिकेला प्रतिउत्तर देत रुपाली चाकणकरांनी देखील निशाणा साधला होता.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021