नवी दिल्ली: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरूच आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 30 पैसे आणि 37 पैशांची वाढ केली. या दरवाढी नंतर जळगावमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर चा दर १०९.८७रुपये आहे. तर डीझेलचा प्रति लिटरचा दर ९८.४४ रुपये इतका आहे.
तर मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.96 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 99.17 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.94 आणि 91.42 रुपये इतका आहे.
भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक
या इंधन दरवाढीमुळे भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 111 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 109.40 आणि 100.10 रुपये इतकी नोंदवण्यात आली. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (आरपीडीए) च्या आकडेवारीनुसार, जयपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.