उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवरील हिंसाचारावर माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवारांनी जोरदार टीका करत मोदी सरकार व योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवरील हिंसाचारावर जोरदार टीका केली. या प्रकरणावर केंद्र किंवा उत्तर प्रदेश सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या अपघाताबाबत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने असंवेदनशीलता दाखवली असल्याचं यावेळी शरद पवार म्हणले.
आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत…
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्या करिता आम्ही प्रयत्न करू… आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करू असे आश्वासन देखील शरद पवारांनी यावेळी दिले.
आज नई दिल्ली में मीडिया से बातचीत के दौरान लखीमपुर खीरी में किसानों के खिलाफ हुई हिंसा की कड़ी आलोचना की। इस मामले पर न तो केंद्र और न ही उत्तर प्रदेश सरकार ने अभी तक कोई प्रतिक्रिया व्यक्त की है। केंद्र सरकार और उत्तर प्रदेश सरकार ने इस दुर्घटना के बारे में संवेदनहीनता दिखाई है। pic.twitter.com/qjwHd0i4Wf
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 5, 2021