एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार एकूण २९० पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल.
या पदांसाठी भरती
1) उप जिल्हाधिकारी, गट-अ 12
2) पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 16
3) सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 16
4) गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ 15
5) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 15
6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ 04
7) सहायक कामगार आयुक्त, गट-अ 22
8) उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब 25
9) कक्ष अधिकारी, गट-ब 39
10) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
11) सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब 17
12) सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब 18
13) उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 15
14) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
15) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब 01
16) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब 16
17) सरकारी कामगार अधिकारी, गट-ब 54
शैक्षणिक पात्रता:
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.
वयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याला आज, मंगळवारी (पाच ऑक्टोबर) सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल.
खुल्या प्रवर्गासाठी ५४४ रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी ३४४ रुपये शुल्क आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा