जळगाव,(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाने अतिवृष्टी होतं असून नद्या दुथळी वाहत आहेत, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो होतांना दिसत असून पिकांचे अतोनात नुकसान देखील पाहायला मिळत आहे. असं असलं तरी गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसतील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
येत्या 24 तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
गुलाब चक्रिवादळाचे आता राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48तास राज्यावर दिसतील. येत्या 24तासात,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची पण शक्यता. मुंबई,ठाणे पण.विदर्भात प्रभाव कमी. उद्या उ कोकण व उ मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील
-IMD pic.twitter.com/sb2syKG56i— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 28, 2021