चाळीसगाव प्रतिनिधी । विहीरीत पडून एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील बोढरे येथे घडली. अनिल शिवाजी राठोड (वय-१७) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, अगोदरच घरात हलाखीची परिस्थिती असल्याने आई-वडील ऊसतोडीणीचे कामे करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र काळाने त्यांच्यावर घातलेल्या घालामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.