महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडामध्ये विविध पदांच्या ५६५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी १७ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत. उमेदवारांना १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
रिक्त जागांचा तपशील
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)च्या १३ जागा, उप अभियंता (स्थापत्य)च्या १२ जागा, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारीच्या दोन जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)च्या ३० जागा, सहायक विधी सल्लागारच्या २ जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)च्या ११९ जागा, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायकच्या ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या ४४ जागा, सहाय्यकच्या १८ जागा, वरिष्ठ लिपिकच्या ७३ जागा, कनिष्ठ लिपिक-टंकलेखकच्या २०७ जागा, लघुटंकलेखकच्या २० जागा, भूमापकच्या ११ जागा आणि अनुरेखक पदाच्या ७ जागा रिक्त आहेत.
या रिक्त पदांसाठी १७ सप्टेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत असून उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पदभरतीमध्ये आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://mhada.gov या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा