चाळीसगाव – शहरातील आई हॉस्पिटल व शारदा नेत्रालय (धुळे) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मेहुणबारे येथे भव्य नेत्र रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपसरपंच रुषिकेश अमृतकर,भैयादादा वाघ.ऐयासभाई पठाण,ग्रा.पं.सदस्य पोपट साळवे,आबा महाजन,देविदास महाजन,मनिषाताई पाटील,मनोज पाटील,प्रविण वाघ,प्रविण चव्हाण,गणेश मोरे,अशोक वाघ,डॉ.विनोद कोतकर,डॉ. चेतना कोतकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी आई हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेकविध शिबीरातून आजवर राबविलेले उपक्रम हे समाजातील गरजूंसाठी लाभदायक ठरत असून समाजसेवेची परंपरा यापुढेदेखील व्यापक प्रमाणात घेण्याचा आमचा प्रयत्न असेल असे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
जनतेमध्ये जाऊन त्यांच्या गरजांच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन ही काळाची गरज असून त्या शिबिरांमधून फायदा होणार्या लाभार्थींचे चेहर्यावरचे समाधानअधिक काम करायला प्रेरणा देत असल्याचे डॉ.विनोद कोतकर यांनी शिबीराप्रसंगी व्यक्त केले.
शिबीरादरम्यान सुमारे 178रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर यात 23 मोतिबिंदू असलेल्या रुग्णांना आई फाउंडेशनच्या वतीने पुढील शस्त्रक्रियेसाठी शारदा नेत्रालय धुळे येथे पाठविले असल्याची माहीती डॉ.विनोद कोतकर यांनी यावेळी दिली.