मुंबई: मागील काही दिवसापासून देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसत आहे. कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम भारतीय सोने बाजारात पाहायला मिळत आहे. सोने-चांदी दरात आजही घसरण झाली आहे.
मंगळवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.1 टक्क्यांनी म्हणजे साधारण 48 रुपयांनी घसरला. तर डिसेंबर वायदाच्या चांदीचा दर 0.24 टक्के म्हणजे साधारण 149 रुपयांनी घसरला. त्यामुळे मंगळवारी सोन्याचा प्रतितोळा दर 46,860 रुपये या पातळीवर आहे. तर चांदीचा प्रतिकिलो दर 63,196 रुपये इतका नोंदवण्यात आला.
गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने 9340 रुपयांनी स्वस्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने दरात घसरण पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने दरात घसरणीचं कारण डॉलर आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव –
गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 50340 रुपये आहे. चेन्नईत 48380 रुपये, मुंबईत 47000 रुपये आणि कोलकातामध्ये 49250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
MCX वर ऑक्टोबरमध्ये सोने दरात वाढ होऊ शकते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.