कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) अटल विमा कल्याण योजनेला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे नोकरी गमावलेल्या बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे,आता नोकरी गमावलेल्या बेरोजगारांना ३०जून २०२२ पर्यंत बेरोजगारी भत्ता मिळणार आहे.
एखाद्याची कोणत्याही कारणास्तव नोकरी गमावलेल्या विमाधारकांना तीन महिन्यांच्या एकूण पगाराचा ५० टक्के बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे.केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 1८५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे, परिस्थिती अजूनही पूर्वरत येत नसल्याने ईएसआयसीच्या १८५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ABVKY चा लाभ ज्यांना नोकरी गमावली आहे त्यांना दिला जातो. या अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ESIC (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) कडून आर्थिक मदत किंवा भत्ता दिला जातो. यासह, अर्जदार आणि कुटुंबाला सहा महिन्यांसाठी ईएसआयसी कव्हर किंवा वैद्यकीय सुविधा देखील मिळते. जर एखादी व्यक्ती आपली नोकरी गमावते, तर तो पुढील सहा महिन्यांसाठी त्याच्या आश्रित व्यक्तींना ईएसआयसीद्वारे उपचार करू शकतो.
अटल विमा व्यक्ती कल्याण योजना काय आहे जाणून घेऊया…
अटल विमा व्यक्ती कल्याण योजना १जुलै २०१८ रोजी सुरू करण्यात आली.या योजनेअंतर्गत, विमाधारक व्यक्तींना बेरोजगारी झाल्यास रोख भरपाई दिली जाते.
ही योजना ‘कर्मचारी राज्य विमा महामंडळ’ राबवत आहे.