नशिराबाद : बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे घडला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजरूल इस्लाम खलील अहमद रा. परकोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ते ९ सप्टेंबर रात्री ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून लॉकर तोडून त्यातील सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नजरूल इस्लाम खलील अहमद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.
















