भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या १८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदांचा तपशील
कार्यकारी शाखेत विविध पदांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. सामान्य सेवा [जीएस (माजी)] / हायड्रो केडरमध्ये 45 जागा, एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) साठी 04 जागा, ऑब्झर्व्हरसाठी 08 जागा, पायलटसाठी 15 जागा, लॉजिस्टिक्ससाठी 18 जागा निश्चित कऱण्यात आल्या आहेत.
टेक्निकल ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग शाखेसाठी (सामान्य सेवा) 27 पदे, इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा)साठी 34 पदे तर नेव्हल आर्किटेक्ट (एनए) – 12 पदे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षण शाखेतून 18 पद भरली जाणार आहेत.
पात्रता :
पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी नोटिफिकेशन पाहण्याचं आवाहन करण्यात आलंय. कार्यकारी शाखेतील ऑफिसर पदासाठी विद्यार्थ्याचं अभियांत्रिकीचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर, शिक्षण ब्रँचसाठी एमएससी प्रथम श्रेणीतून आणि एम ए इतिहास 55 गुणांसह, तर बी टेक आणि बीई डिग्री असलेल्या उमेदावारांनी 60 टक्के गुण मिळवेलेले असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. शिक्षण आणि तांत्रिक शाखेसाठी अर्जदारांचा जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान असावा. तर 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 आणि 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान जन्मलेल्या कार्यकारी शाखेचे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज दाखल करण्यास कधीपासून सुरुवात?
भारतीय नौदलानं शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास 18 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं जाहीर केलं आहे.या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना 22 जूनपासून सुरु होणाऱ्या इंडियन नावल अकादमी एझिमाला केरळ मधील बॅचमध्ये दाखल करण्यात येणार आहे
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा