जळगाव, ( प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अभिषेक पाटील यांनी पदावरून कार्यमुक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र दिल्या नंतर आज दिनांक 10 रोजी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला.
महानगर प्रमुख पदाधिकारी स्वप्निल नेमाडे, अँड. कुणाल पवार, तुषार इंगळे, जितेंद्र चांगरे, अक्षय वंजारी , आरुही नेवे,OBC सेलचे पदाधिकारी सह शहर महिला आघाडी यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामे दिल्याचे सांगितलं.