नवी दिल्ली: वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचे खिसे खाली होत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, दूध, ब्रेडचे भाव भरमसाट वाढले असता आता साबण, डिटर्जंटच्या किंमतीही महाग झाल्या आहेत. देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी HUL ने व्हील पावडरच्या किंमतीत 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. याशिवाय लक्स साबणाच्या किमतीतही 8 ते 12 टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच आता ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे.
आता डिटर्जंट, साबणांच्या किमती 14 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, इंधनाच्या किंमतीमुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे. लक्स साबण हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा आवडता ब्रँड आहे, जो ब्रिटिश कंपनी युनिलिव्हरची उपकंपनी आहे. लक्स साबण हे कंपनीच्या लोकप्रिय उत्पादनांपैकी एक आहे जे भारतातील जवळजवळ सर्व घरांमध्ये वापरले जाते.
कोणते उत्पादन अधिक महाग झाले?
1. व्हील पावडरची किंमत 3.5 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच, आता अर्ध्या किलोच्या (500 किलो) पॅकवर किंमत 1-2 रुपयांनी वाढेल.
2. सर्फ एक्सेल इजी वॉश व्हेरिएंट 1 किलो पॅकेटची किंमत 100 रुपयांवरून 114 रुपये होईल.
3. रिनच्या 1 किलो पॅकेटची किंमत 77 रुपयांवरून 82 रुपये होईल. अर्धा किलो (500 किलो) ची किंमत 37 रुपयांवरून 40 रुपये होईल.
4. लक्स साबणाची किंमत 12 टक्क्यांनी वाढेल.
5. लाईफबॉय साबणाची किंमत 8 टक्क्यांपर्यंत वाढेल.
इतर कंपन्याही किंमत वाढवू शकतात
तज्ज्ञांच्या मते, इतर FMCG कंपन्याही त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवू शकतात. कारण कोरोना कहरानंतर खर्च वेगाने वाढत आहे. पाम तेलापासून तेलाच्या किमती सतत विक्रमी उच्चांकावर आहेत. म्हणूनच इतर कंपन्याही आता किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.