मुंबई – आयोगा समोर गैरहजर राहणे चांगलेच महागात पडले असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
काय आहे प्रकरण…
१०० कोटी वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात पन्नास हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगासमोर परमबीर सिंह उपस्थित राहत नसल्यामुळे सुनावणी वारंवार पुढे ढकलावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर मंगळवारी पन्नास हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट आयोगाने जारी केले आहे.
याआधी परमबीर सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आता परमबीर सिंहाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. गेल्या सुनावणीमध्ये आयोगासमोर हजर न राहिल्यास वॉरंट काढण्याचे आदेश देण्यात आले होते तरी देखील ते हजर न राहिल्याने आयोगाने अखेर हे वॉरंट काढले आहे.