मुंबई : जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सहावी मालिका आज बंद होणार आहे. 30 ऑगस्ट रोजी ही मालिका 5 दिवसांसाठी उघडण्यात आली.
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची किंमत
सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम 2021-2022 च्या सहाव्या मालिकेसाठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या वर्षी एकूण 6 सीरिजमध्ये सॉवरेन गोल्ड बाँड विकण्याची घोषणा केली होती. पहिली सीरिज 17 मे रोजी रिलीज झाली होती आणि 21 मेपर्यंत विक्रीसाठी खुली होती. सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा सरकारी बॉण्ड आहे. त्याचे मूल्य सोन्याच्या वजनाच्या दृष्टीने निश्चित केले जाते.
अशा प्रकारे तुम्ही सवलतीचा लाभ घेऊ शकाल
रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून सरकार ‘ऑनलाईन’ अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या गुंतवणूकदारांना सूटही देत आहे. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने पैसे दिले तर तुम्हाला 50 रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉण्डची इश्यू किंमत 4,682 रुपये प्रति ग्रॅम असेल. सामान्य गुंतवणूकदार 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतच्या संख्यांसह गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करू शकतात.
किती व्याज मिळणार?
भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे बॉण्ड जारी केले जातात. बाँडची हमी सरकारकडून दिली जाते. सरकारने 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले होते की, या योजनेतून 31,290 कोटी रुपये जमा झालेत. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध होईल. करदात्यांच्या इतर स्त्रोतांकडून उत्पन्न म्हणून ते जोडले जाते.