जळगाव : कर्नाटकात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्या निर्माण झाला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या २४ तासात जळगावसह पालघर, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, नाशिक येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यभरात जोरदार पाऊस बरसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यानुसार जळगावसह पालघर, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, नाशिक येथे मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यादरम्यान, चाळीसगाव तालुक्यात काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झालाय तर अनेक गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आलीय.
दरम्यान, मराठवाडा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र हवामाव खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कमी होईल मात्र पावसाची संततधार कायम असणार आहे.