नवी दिल्ली : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा या ना त्या कारणाने प्रियंका सतत चर्चेत असते. सध्या प्रियंका लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड सिनेमाचं शूटींग करतेय. तूर्तास मात्र प्रियंका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्रियंकानं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
नेमकं फोटोत आहे तरी काय?
प्रियांका सोफ्यावर पालथी झोपली असून, निक तिला स्नॅक म्हणून खाताना दिसत आहे. तिने या फोटोला ही स्नॅक अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी तिला लाईक, हर्ट सारखे इमोजी कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहेत. तर काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे.