जळगाव,(प्रतिनिधी) – बहुचर्चित ‘त्या’ सीडी बाबत अखेर एकनाथराव खडसेनीं यांनी पुन्हा एकदा विधान केले असून ‘त्या’ सीडीला पोलिसांना सुपूर्द करण्यात आली असून पोलीस चौकशी करत असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या व्यासपीठावरून ईडी लावली तर सीडी लावेन असे एकनाथराव खडसे म्हणाले होते. दरम्यान आज त्या बाबत खडसे यांना विचारणा केल्या नंतर गेल्या सहा महिन्यांपासून ती सीडी मी पोलिसांकडे दिली आहे. पोलिस त्याबाबत चौकशी देखील करत असल्याची खळबळजनक माहिती त्यांनी यावेळी दिली . तसेच योग्य वेळी मी सीडी लावणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.