अमळनेर,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूरग्रस्तांच्या हाकेला शिवरामे कुटूंबाने चादरी देत साद दिली.महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मोठया प्रमाणात पाऊस पडल्याने कोकण सह पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घालून अतोनात नुकसान केले. अनेक गावांसह कुटुंब उध्वस्त झाले.संसार उघड्या वर आले. त्या पूरग्रस्तांना या संकटात मदत व्हावी म्हणून जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतीच्या हाकेला साद देत जिल्ह्यातील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला.
जीवनावश्यक वस्तू सह कपडे स्वरूपात सढळ हाताने मदत केली. पत्रकार संघाच्या हाकेला साद देत व माणुसकीजपत अमळनेर उपाध्यक्ष विजय गाढे यांचे जळगांव येथिल सहसंचालक( उच्च शिक्षण) जळगांव कार्यालयात कार्ययरत असलेले परममित्र श्री अजय पंडितराव शिवरामे व सौ राजश्री अजय शिवरामे या कुटूंबाने मदत म्हणून एकूण 30 चादरी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांना सुपूर्द करून आपले सामाजिक दातृत्व पार पाडले.याप्रसंगी संघाचे दिपक सपकाळे, विजय गाढे उपस्थित होते.त्यांचे पत्रकार संघ व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.