युनियन बॅंकेमध्ये विविध पदांच्या ३४७ जागांसाठी भरती निघाली आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे अर्ज करायचा आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर आहे.
या दहा पदांची होणार भरती:
वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता), व्यवस्थापक (वास्तुविशारद), व्यवस्थापक (विद्युत अभियंता), व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ), व्यवस्थापक (फोरेक्स), व्यवस्थापक (सनदी लेखपाल), सहायक व्यवस्थापक (तंत्र अधिकारी), सहायक व्यवस्थापक (फॉरेक्स) या दहा पदांअतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शेवटची तारीख
यासाठी बॅकेंतर्फे महत्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार १२ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरणे, सूचना शुल्क भरु शकतात. ३ सप्टेंबर ही अर्ज आणि शुल्क भरण्याची अखेरची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
परीक्षा फी : ८५० रुपये /-
अर्ज कुठे पाठवाल?
उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी बॅंकेची अधिकृत वेबसाइट www.unionbankofindia.co.in वर जावे लागेल. त्यातील रिक्रूटमेंट आणि करिअर सेक्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला पदभरतीचे नोटिफिकेशन वाचता येईल.
जाहिरात Notification : पहा
ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लीक करा