जळगाव,(प्रतिनिधी): जळगाव महानगरपालिकाचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी संशयित फरार असलेल्या महेंद्र पाटील यास पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आली आहे.
रामानंद नगरचे स.पो.नि. संदीप परदेशी व त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय सपकाळे, पोलिस नाईक संदिप महाजन, पो.कॉ. अजय सपकाळे, पो.नाईक प्रविण जगदाळे व पोलिस नाईक सुशिल चौधरी यांच्या पथकासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी समाधान पाटील व हेमनाथ पाटील आदींनी कसून शोध घेत फरार महेंद्र पाटील यास म्हसावद येथुन अटक अटक केली आहे.
दरम्यान उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्या प्रकारणांनाने शहरात खळबळ उडाली होती. हल्लेकऱ्यांना तात्काळ अटक करा व कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.