जळगाव, (प्रतिनिधी) दि. 26 – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु असून जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 108.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. तर जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
जिल्ह्याचे जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 189.2 मिलीमीटर इतके असून या महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 108.8 मिलीमीटर म्हणजेच जुलै महिन्याच्या सरासरीच्या 57.5 टक्के इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात तालुकानिहाय 26 जुलै, 2021 पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जुलै महिन्याच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 97.7 मिलीमीटर (44.6 टक्के), भुसावळ- 60.00 मि.मी. (30.8%), यावल- 76 मि.मी. (37.1%), रावेर- 107.8 मि.मी. (58.9%), मुक्ताईनगर- 101.2 मि.मी. (57.5%), अमळनेर- 87.4 मि.मी. (46.6%), चोपडा- 90.5 मि.मी. (42.3%), एरंडोल- 167.5 मि.मी. (87.4%), पारोळा- 138.6 मि.मी. (76%), चाळीसगाव- 144.7 मि.मी. (91.8%), जामनेर- 113.1 मि.मी., (57.2%), पाचोरा- 115.3 मि.मी. (64%), भडगाव- 115.8 मि.मी. (66.9%) धरणगाव- 128.5 मि.मी. (56.7%), बोदवड- 89.3 मि.मी. (43.9%) याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 108.8 मि.मी. म्हणजेच 57.5 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
00000