जळगाव,(प्रतिनिधी) – वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी CBSC इंग्लिश मिडीयम स्कुल, जळगाव येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आज दिनांक 20 रोजी साजरा करण्यात आला.आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या प्रांगणात सुंदर असे देखावे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे संस्था अध्यक्ष श्री. नरेंद्र मोदी व मुख्याध्यापाक श्री. आशिष अजमेरा, सौ. विनिता खडसे यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणीची पूजा करण्यात आली.ऑनलाईन माध्यमाने हा सर्व कार्यक्रम पार पडला यात रुख्मिणी परा खारोळे, नुपूर नारखेडे, निधी शिंदे व विठ्ठल मंथन पवार, कुशल गंधाली, सर्वेश गिते व वासुदेव मोरया बाविस्कर हे होते कार्यक्रम चे आयोजन वर्धमान स्कुलचे सर्व शिक्षक व सहकारी यांनी यशस्वीरित्या पार पाडला.