Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !

najarkaid by najarkaid
June 4, 2021
in Uncategorized
0
विवरे बु॥उपसरपंच सौ भाग्यश्री पाटलांनी दाबावापोटी दिलेला राजीनामा नामंजूर !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्या च्या राजकारणात महत्वाच्या ठरणाऱ्या विवरे बु॥ ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक सत्ताधारी गट प्रमुख वासुदेव नरवाडे व विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्यात वर्चस्वा साठी जिकरीची ठरली. यात वासुदेव नरवाडे गटाने बाजी मारत वर्चस्व सिद्ध केले. तर विरोधी गट प्रमुख विपीन राणे , शिवाजी पाटिल यांच्या गटाला सुरूंग लावल्याने भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे दोन सदस्यांनी गटप्रमुखांच्या निष्क्रीयतेला रामराम ठोकल्याने पानिपत झाले. वासुदेव नरवाडे गटात १५पैकी ९ सदस्य आल्याने वर्चस्व कायम राहिले. तर विरोधी गटाला खिंडार पाडून रामराम ठोकत विनोद मोरे हे वासुदेव नरवाडे गटात सामील झाले.

१२ फेबुवारी रोजी उपसरपंच निलीमा सणंसे यांची निवड होवून २३ एप्रील रोजी राजीनामा दिल्याने मंजूर करण्यात आला होता. या रिक्त उपसरपंच पदासाठी ६ मे रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांनी विरोधी गटाला सुरूंग लावल्याने सौ भाग्यश्री विकास पाटिल उपसरपंच झाल्या. परंतु विरोधकांनी गोंधळ घालून व दबाव टाकून लगेच दोन दिवसात ८ मे रोजी राजीनामा सरपंचां समोर ठेवला. त्या राजीनाम्याच्या पडताळणी साठी ३१ मे रोजी मासिक सभा घेण्यात आली. हि मासिक बैठक कोरम अभावी तहकुब करण्यात आल्याने २ जुन रोजी विशेष बैठक सरपंच युनुस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर बैठकीत ८ मे रोजी दिलेला राजीनामा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावापोटी भितीने दिला असल्याने मंजूर करण्यात येवू नये. असे उपसरपंच सौ भाग्यश्री पाटिल यांनी लेखी पत्राद्वारे सांगितल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा नाकारण्यात आला पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे वर्चस्व सिद्ध झाल्यामुळे विनोद मोरे हे सुद्धा विरोधकांना सोड चिठ्ठी देवून नरवाडे गटात सामील झाल्याने त्यांचा शाल श्रीफळ देवून सदस्या श्रीमती रेखा गाढे यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच युनुस तडवी, वासुदेव नरवाडे , युसुफ तडवी , रेखा गाढे , सौ स्नेहा पाचपांडे , नौशादबी इस्माईल खा , विनोद मोरे , सौ ज्योती सपकाळ, इस्माईल खा इब्राहिम खा, विकास पाटिल , भागवत महाजन , गणेश सपकाळ , यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
……………………………………..
८ मे रोजी माझे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने दबावा पोटी व भितीने राजीनामा दिला होता. आज रोजी माझे मानसिक स्वास्थ ठिक असल्याने माझा राजीनामा मंजूर करण्यात येवू नये. असा अर्ज मासिक बैठकीत दिल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. विरोधी गटाने याचा चांगलाच धसका घेतला.
सौ भाग्यश्री विकास पाटिल
नवनिर्वाचित उपसरपंच, विवरे बु॥
…………………………………..
निवडून आल्यानंतर चार महिन्या पासुन ग्रामपंचायतीत कार्यरत झालो. परंतु गावाची कामे होत नव्हती. म्हणून विपीन राणे व शिवाजी पाटिल या पॅनलमध्ये नाट्यमय राजकारण चालु होते म्हणून मी विरोधी गटाला सोड चिठ्ठी देवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी पॅनल प्रमुख वासुदेव नरवाडे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे गटात सामील झालो. मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करून वार्डाचा विकास करणार आहे. असे नजरकैद शी बोलत होते .
विनोद मोरे,
ग्रा प सदस्य विवरे
…………………………………….
जातीपातीचे राजकारण न करता सर्वांची कामे करतो. तसेच गावाचा सर्वांगीण विकास करू शकतो. असा गावातील जनतेचा माझ्यावर आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये. असा सतत प्रयत्न असतो. माझ्या पॅनल मध्ये ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सर्वच जाती , समाजाचे नेतृत्व करणारे सदस्य आहे. यात मुस्लीम ,माळी , लेवा पाटिल , मराठा , तडवी , बौद्ध ,खाटिक , या समाजाचे सदस्य माझ्या सोबत आहे. भाग्यश्री पाटिल व विनोद मोरे हे विरोधकांच्या निष्क्रीयतेला कंटाळून माझ्या सोबत काम करण्यासाठी गटात सहभागी झाले आहे.सर्वांना सोबत,व विश्वासात घेवून राजकारणापेक्षा समाजकारणा वर भर देवून गावाच्या सर्वांगिण विकासाचे काम करणार यात शंका नाही.
वासुदेव नरवाडे
सत्ताधारी पॅनल प्रमुख,
विवरे बु॥ ग्रा.प.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१० वी उत्तीर्णांसाठी संधी ; भारतीय सेनामध्ये १०० जागांसाठी भरती

Next Post

रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

रावेर तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना रो.ह.योजनेअंतर्गत मदत मिळावी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us