Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

Editorial Team by Editorial Team
June 1, 2021
in Featured, राज्य
0
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : आज म्हणजे 1 जून रोजी बरेच नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. यातील काही नियम आपल्याला दिलासा देऊ शकतात तर काहींमुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागू शकते. या नियमांबद्दल मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांना हे माहित असणे महत्वाचे आहे. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. यात बँकेचे काम, एलपीजी सिलिंडरचे दर, विमान भाडे, बचत योजनांवरील व्याज आणि आयटीआर फायलिंग याचा समावेश आहे.

करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार

आयकर विभाग पुढील महिन्यात करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ होईल. 1 ते 6 जूनदरम्यान विद्यमान वेब पोर्टल सहा दिवस बंद असेल. यानंतर 7 जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होईल. कर विभागाच्या प्रणाली विभागांकडून जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, ‘विद्यमान वेब पोर्टलवरून www.incometaxindiaefiling.gov.in नवीन वेब पोर्टल www.incometaxgov.in वर हस्तातरणाची प्रक्रिया1 जून रोजी पूर्ण होईल आणि या दिवशी नवीन वेब पोर्टल कार्यान्वित होईल.

बँक ऑफ बडोदाची नवी यंत्रणा

बँक ऑफ बडोदा आजपासून चेक पेमेंटचे नियम बदलणार आहे. बँकेच्या वतीने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन नियम आजपासून लागू होणार आहे. फसवी चेक रक्कम लक्षात घेता पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन लागू केले जात आहे. ही यंत्रणा केवळ 50 हजार रुपयांच्या धनादेशाच्या वर लागू असेल. याचा फायदा घेण्यासाठी प्रथम बँकेकडून खातरजमा होणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला काही महत्त्वाची माहिती देईल, तरच ही सुविधा उपलब्ध होईल.

सिलिंडर किंमत

दरमहा एलपीजी सिलिंडरची किंमत बदलते. आजही यात बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरची किंमत बदलतात. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमतीत फरक दिसू शकेल. आतापर्यंतच्या ट्रेंडप्रमाणेच सिलिंडर गॅस महाग होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ही 809 रुपये इतकी आहे.

सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड बदलणार

कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर सिंडिकेट बँकेच्या सर्व शाखांचे आयएफएससी कोडही बदलले आहेत. कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या बँकेच्या म्हणजेच सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड 1 जुलैपर्यंत वैध राहतील. त्यामुळे ग्राहकांनी 30 जूनपर्यंत IFSC कोड अपडेट करावे, अशी सूचना केली आहे.  यानंतर नव्या आयएफएससी कोडद्वारे पैशांचा व्यवहार केला जाईल. जर आपल्याला कोणी पैसे पाठवणार असेल तर त्यांना आयएफएससी कोड बदलल्याचे आधीच कळवा, जो बँक तपशिलात बदलला जावा. अन्यथा पैसे हस्तांतरीत करणे कठीण होऊ शकते.

गुगलमध्ये मोठा बदल

आजपासून गुगलमध्ये एक मोठा बदल होणार आहे. आजपासून Google आपल्या फोटो अ‍ॅपसाठी अनलिमिटेड फोटोज अपलोड करण्याचा अ‍ॅक्सेस देणार नाही. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक युजरला केवळ 15 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल, ज्यात जीमेलवरील ईमेलसह फोटो समाविष्ट आहेत. यात आपले फोटो, व्हिडिओ आणि गुगल ड्राइव्हवरील इतर फाईल्स देखील समाविष्ट असतील. हा 15GB स्पेस वापरल्यानंतर, आपल्याला अधिक स्पेस वापरण्यासाठी Google One चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. गूगल वनच्या मिनिमम सबस्क्रिप्शनच्या 100 जीबी स्टोरेज स्पेससाठी, युजरला दर महिन्याला 130 रुपये किंवा प्रतिवर्ष 1300 रुपये द्यावे लागतील.

पीएफ नियम

पहिल्यांदा पीएफबद्दल जाणून घेऊयात. कर्मचार्‍यांसाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. 1 जूनपासून पीएफच्या नियमांमध्ये काही बदल केले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. नव्या नियमानुसार, आता कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार कार्डशी लिंक करावे लागेल. हा नियम 1 जूनपासून लागू असेल. जर पीएफ खाते आधारशी जोडलेले नसेल तर कंपनीकडून पीएफमध्ये सामील होणारी रक्कम थांबू शकेल. याचा थेट परिणाम आपल्या जमा झालेल्या भांडवलावर होऊ शकतो. हे कार्य खूप सोपे आहे आणि पीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे केले जाऊ शकते

विमानांच्या भाड्यावर परिणाम

सरकारच्या आदेशानुसार 1 जूनपासून हवाई प्रवास महागणार आहे. सरकारने कमीत कमी हवाई भाड्याची मर्यादा 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिलीय. ही वाढ 13 ते 16 टक्के असेल. याचा थेट परिणाम हवाई भाड्यावर दिसून येईल. महागड्या तिकिटांवर होणारा परिणाम कमी होईल, पण स्वस्त तिकिटे महाग होतील. हवाई भाड्यांची कमी मर्यादा वाढविण्याचा थेट परिणाम स्वस्त तिकिटावर दिसून येईल. आताच याचा परिणाम थोड्या लोकांवर दिसून येईल, कारण हवाई प्रवास थांबलेला आहे आणि त्यामध्ये प्रवाशांची संख्या नाममात्र आहे, जी सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

Next Post

वसई विरार शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या ४४० जागांसाठी भरती

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
वसई विरार शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या ४४० जागांसाठी भरती

वसई विरार शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांच्या ४४० जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us