मुंबई,(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात आता ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report) दाखल केला असून याप्रकारणात इडी तपास करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता गुन्हा दाखल करून भर टाकली आहे.