रावेर-(विनोद कोळी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर तर्फे ग्रामीण रुग्णालयास ‘ऑरो फिल्टर’ व “वॉटर कूलर”चे लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णासाठी तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी पाण्याची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व समाजसेवक डॉ.कुंदन फेंगडे यांच्या माध्यमातून रुग्णालयास वॉटर कुलर भेट देण्यात आले.या जलसेवेमुळे रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा व त्याच्या नातेवाईकांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे व डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
तसेच त्या ठिकाणी असलेल्या कोरोना रुग्णांना मंत्र्यांच्या हस्ते भोजन व हळदीचे दूध वितरण करण्यात आले. यावेळी अ.भा.वि.प. भुसावळ जिल्हा संयोजक अभिजित लोणारी, जिल्हा एकलव्य प्रमुख युवराज माळी, रावेर नगर कार्यकवाह चंद्रकांत राऊत सर, जिल्हा व्यवस्था प्रमुख संदीप महाजन, अनिकेत सरोटे, लोकेश पाटील, रावेर शहरमंत्री राहुल पाटील, निलेश पाटील, तुषार महाजन, अविनाश पाटील, भूषण महाजन,कुंदन बाविस्कर, संदीप महाजन, रवी सोनार, निलू माळी, भूषण सोनार, मनोज श्रावक, अजिंक्य वाणी, गणेश शिंदे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.