Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अहिंसा ही मानवतेने जगण्याची एकमेव आशा – प्रो. नॅगलर

गांधी रिसर्च फाउण्डेशन प्रस्तुत अहिंसेवर आधारित ‘द थर्ड हार्मनी’ लघुपटाचे प्रथमच आशियात विमोचन

najarkaid by najarkaid
May 10, 2021
in जळगाव
0
अहिंसा ही मानवतेने जगण्याची एकमेव आशा  – प्रो. नॅगलर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – “अहिंसा हा एक पर्याय नसून तीच मानवतेने जगण्याची एक आशा आहे” असे प्रतिपादन लघुपट प्रदर्शनाचे संचालक प्रो. नॅगलर यांनी केले. जळगावच्या गांधी रिसर्च फाउण्डेशन, (जीआरएफ) तथा कॅलिफोर्निया, यू. एस. स्थित मेट्टा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसेवर आधारित ‘द थर्ड हार्मनी’ लघुपटाचा आशियात प्रथमच ऑनलाईन प्रदर्शनाच्या वेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, अहिंसेच्या भिंगातून जीवन बघायला सगळे जग भारताकडून शिकले आहेत. त्यांनी अहिंसेच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

अहिंसेवर आधारित ‘द थर्ड हार्मनी’ लघुपटाचा प्रथमच आशियात ऑनलाइन पद्धतीने नुकताच विमोचन सोहळा शनिवार, दि. 8 मे 2021 रोजी पार पडला. जगभरातील संघर्षात अहिंसेची भूमिका अधोरेखित करणारा प्रस्तुत लघुपट 44 मिनिटांचा असून, मानवी स्वभावाचा नवा पैलू दर्शवतो. माणसाच्या जाणिवांचा विकास करतो आणि जगण्याचं समाधान ही मिळवून देतो. अहिंसेचा समाजाला होत असलेला उपयोग आणि फायदा कसा परिणामकारक आहे हा ‘द थर्ड हार्मनी’ लघुपटाचा मुख्य गाभा आहे. लघुपटातील अनेक भावनाशील प्रसंगात अहिंसेचा प्रभाव दिसून येतो. उदाहरणार्थ एक पॅलेस्टाईन नेता अली अबु आवाद जाहीर करतो की अहिंसा स्वीकारणे म्हणजे आपल्या मानवतेचा एक सुहृदय सदस्य होणे. गोऱ्या अमेरिकनांचे प्रतिनिधी मूळच्या अमेरिकन लोकांची विना अट माफी मागतात हे सत्य आणि तडजोड दाखवली आहे. अमेरिकेत शतकांपासून चालत असलेल्या नरसंहार आणि अत्याचारामुळे दोन्ही गटात अश्रू वाहिले होते. एक अहिंसावादी तरूण त्याला मारहाण न केल्याबद्दल पोलीसांचे आभार मानतो, पोलीसही त्याच्या कृतज्ञतेबद्दल त्याला धन्यवाद देतात.

‘द थर्ड हार्मनी’ या लघुपटाची ऑक्टोबर २०२० मध्ये ‘युनायटेड नेशन्स असोसिएशन फिल्म फेस्टीव्हल’मध्ये ६०० लघुपटांमधून निवड करण्यात झाली. या लघुपटाच्या आशियातील प्रिमिअरला बाराहून जास्त आशिया आणि युरोपियन देशांतील अनेक पाहुणे उपस्थित होते. तसेच काही दक्षिण आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील काही प्रतिनिधींनीसुद्धा या लघुपटाचे परीक्षण केले.

प्रिमिअरनंतर झालेल्या चर्चेत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर व विश्वस्त आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री अशोक जैन यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अनेक ज्येष्ठ विद्वानांनी या लघुपटाचे परीक्षण केले. प्रो. एम पी मथाई, डॉ. सुदर्शन अय्यंगार, श्री तुषार गांधी, डॉ. सिबी के. जे. आणि कु. जॅकेलीन डेल कास्टीलो यांचा समावेश होता. एलिसबेट्टा, कोलग्रोसी (रोम, इटली), प्रो. वासंती राजेंद्रन (आरजीएनवायडी, चेन्नाई), कु. इस्ला ग्लेस्टर (इंग्लंड), डॉ. हरन मेहता (युएस), श्री रोशन कुवलाल (द. आफ्रिका), डॉ. मन्सूर् अलमास्वर (येमेन) आणि श्री आर्विदास कोन्सेव्हीयस (लिथूएनिया) या काही अभ्यासकांनी लेखी परीक्षण मांडले. गांधी रिसर्च फाउण्डेशनचे डॉ. जॉन चेल्लादूराई यांनी या सोहळ्याचा समन्वय साधला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लसीकरण केंद्रासाठी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात भाजयुमोचे आंदोलन

Next Post

कृषि विषयक विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Next Post
कृषि विभागाची मोठी योजना ; या योजनेत १० लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मिळू शकते…

कृषि विषयक विविध योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us