मुंबई, (प्रतिनिधी)- ठाकरे सरकारनं ‘मनोरा’ आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर काढल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.
‘मनोरा’ आमदार निवास पुनर्बांधणीसाठी ९०० कोटींचे टेंडर बाबत वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली आहेत. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसद भवन पेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना अशा शब्दात त्यांनी रोहित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष करित निशाणा साधला आहे.