Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

अ.भा.मराठी नाट्य परिषद व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

najarkaid by najarkaid
May 6, 2021
in जळगाव
0
कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (सिध्दांत सोनवणे) – सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे . गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. या कलावंतांना आजवर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व खान्देश लोककलावंत परिषदेतर्फे धान्य स्वरुपात मदत करण्यात आली परंतु जिल्हाभरातील गरजू कलावंतांची संख्या पाहता ही मदत अपूरी पडत असल्याने प्रशासनाने याबाबतीत लक्ष घालून जास्तीत जास्त कलावंतांना मदत मिळावी यासाठी हे निवेदन देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याला लोककला सादरीकरणा तसेच नाटक, नृत्य, संगीताची प्रदीर्घ अशी परंपरा आहे. एकेकाळी जळगावच्या लोककला, नाट्य, संगीत सृष्टीने सुवर्णकाळ पाहिला आहे.

जळगावातील तमाशा मंडळानी उभ्या महाराष्ट्राला आपल्या कलासादरीकरणाने वेड लावले होते. त्याचप्रमाणे वहीगायन, वासुदेव, गोंधळी सारखा दुर्मिळ प्रकार आजही जळगाव जिल्ह्यात जोपसला जात आहे. जळगावच्या नाट्यकलावंतांनी राज्यभरातील एकांकिका स्पर्धांसह विविध नाट्यस्पर्धा गाजविल्या आहेत. तसेच संगीत व नृत्य क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील कलावंतांची कामगिरी उल्लेखनीय आहे. एकंदरीतच या प्रयोगशील कलांच्या सादरीकरणावर अनेक कुटुंबाची गुजराण होत असते.

सद्यस्थितीत गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन व अन्य विविध कारणांनी लोककलांचे सादरीकरण बंद झाले आहे. त्यामुळे या प्रयोगशील कलांवर अवलंबून असणारे अनेक कलावंत व त्यांचे कुटुंबिय आर्थिक ओढगस्तीने ग्रासले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी लोककलावंत परिषद या आमच्या संस्थांच्या माध्यमातून आम्ही या कलावंतांना मदत करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केला आहे परंतु शासकीय स्तरावरून अद्यापही या कलावंतांना मदत मिळालेली नाही.

आजच्या या परिस्थितीत आर्थिक गर्तेत सापडलेल्या या कलावंतांना भरीव अशा आर्थिक मदतीची अपेक्षा असून, प्रशासकीय स्तरावर आपल्यापर्यंत याबाबतीत सर्वच प्रयोगशील कलांचे सादरीकरण करणाऱ्या या कलावंतांचा आवाज पोहचावा व आपल्या माध्यमातून सरकारी स्तरावर त्यांना आर्थिक मदतीचा हात मिळावा.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासह खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी आवाहन केले की, जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनीही पुढे येऊन या कलावंतांना मदत करावी. याकरिता ज्यांना कोणासही मदत करावयाची असल्यास त्यांनी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे (मोबाईल क्रमांक ८८३०४९५८२२) यांना संपर्क करावा.
चौकट – कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी.

कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमदेखील बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कीर्तनकार व त्यांना सहकार्य करणाऱ्या टाळकरी व भजनी मंडळांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांना आतापर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे, मात्र कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळे यापासून वंचित आहेत. जवळपास ९० टक्के कीर्तनकारांचा उदरनिर्वाह हा कीर्तनावर अवलंबून असल्याने, शासनातर्फे कीर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळांना आर्थिक मदत मिळावी याकरितादेखील ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

रोहिणीताईंच्या आवाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रतिसाद

पत्रकारांशी बोलतांना रोहिणीताईंनी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व उद्योजकांनी कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सुनसगाव येथील सरपंच निलेश शालिक साबळे आपल्या वैयक्तिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी रोहिणीताईंच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत कलावंतांकरिता ५ क्विंटल गहू देण्याची तयारी दर्शवून विनोद ढगे यांना संपर्क केला.

Spread the love
Tags: #rohini khadse#अ.भा.मराठी नाट्य परिषद#खान्देश लोककलावंत विकास परिषद
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द धडक दंडात्मक कारवाई

Next Post

खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी येतांना रॅपिड ॲन्टीजेन तपासणी अहवाल स्वीकारणार

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
आता खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट आवश्यक

खरेदी विक्री दस्त नोंदणीसाठी येतांना रॅपिड ॲन्टीजेन तपासणी अहवाल स्वीकारणार

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us