जळगाव – दैनिक नजरकैद वृत्तपत्रास आज दहा वर्ष पूर्ण झाल्याने “दशकपूर्ती” निमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन जलसंपदामंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ना. महाजन यांनी दैनिक नजरकैद वृत्तपत्र निर्भीड लिखाण करणारे जिल्ह्यातील स्थानिक दैनिक वृत्तपत्र असल्याचे सांगत तोंडभरून कौतुक केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी दैनिक नजरकैद चे मुख्यसंपादक प्रवीण सपकाळे यांनी वृत्तपत्राबाबत विस्तृत माहिती देऊन चर्चा केली.प्रवीण सपकाळे हे मूळचे ना. गिरीशभाऊ यांच्या मतदार संघातील मोयखेडा दिगर येथील रहिवासी आहेत. नजरकैद हे सन 2008 साली मोयखेडा दिगर, ता. जामनेर तालुका येथून प्रकाशित होत होते. सहा महिन्यात साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर झाल्याने व गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने मीडिया क्षेत्रात सेवा देत असल्याने ना. गिरीशभाऊंनी समाधान व्यक्त करीत जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्यात यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संपादक प्रविण सपकाळे यांनी ना.गिरीशभाऊ महाजनांचे आभार मानले. यावेळी जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख हे उपस्थित होते.
माननीय प्रविण सकपाळे संपादक दैनिक नजरकैद वृत्तपत्रास आज दहा वर्ष पूर्ण झाल्याने “दशकपूर्ती” निमित्त प्रकाशित केलेल्या विशेषांक आज सोशल मीडियावर पहिले. ते वाचून आनंद वाटला, स्थानिक पातळीवर वृत्तपत्र काढून जिल्हा पातळीवर वाढविणे खुप जिद्दीने काम असते ते प्रवीण भाऊंनी खूप मेहनतीने उभे केले. त्यांनी माझा सारख्या पत्रकार लेखकाला खुप प्रसिद्धी दिली, दैनिक नजरकैद वृत्तपत्र निर्भीड लिखाण करीत असते.ते आता स्मार्टफोनच्या जमान्यात नेटवर उपलब्ध असल्यामुळे त्यांच्याशी लवकर संपर्क करता येतो.तीन वाजता
ई-मेल वर लेख पाठविला आणि चार वाजता तो त्यांच्या इपेपर वर उपलब्ध झाला.आणि मला अभिनंदन करणारे कॉल आले. त्यावेळी मला सुध्दा याबाबत माहिती नव्हती ती दैनिक नजरकैद च्या जागरूक वाचकांनी करून दिली. म्हणूनच प्रविण भाऊ सकपाळे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. म्हणून त्यांच्या सर्व संपादकीय मंडळाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.व भावी वाटचालीस शुभेच्छा.