राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड ठाणे करिता ऑक्सिजन घेण्यासाठी थेट ऑक्सिजन उत्पादक कंपनीत ‘चार’ तास बसून राहिले असं खुद्द जितेंद्र आव्हाड यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे.
ठाण्यात ऑक्सिजन घेण्यासाठी चार तास ऑक्सिजन उत्पादक कंपनीत बसलो …. परिस्थिती वाईट आहे असं मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून माहिती देतांना म्हटलं आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सातत्याने ऑक्सिजन चा तुटवडा भासत असल्याचं भीषण वास्तव आहे. आज चक्क राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ऑक्सिजन करिता ऑक्सिजन उत्पादन कंपनीत चार तास बसून ऑक्सिजन घेतल्याने राज्यात ऑक्सिजन तुटवडा असल्याचं समोर आलं आहे.