यावल (दीपक नेवे)- जिल्ह्याच्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांची निवड कैलास गोरे पाटील राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पत्र पाठवून केली आहे .सदरचे निवड पत्र हे प्रभाकर अप्पा सोनवणे यांना प्राप्त झाले असल्याची माहीती अप्पा यांनी दिली.
याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, . रासरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांचेकडील नियुक्ती पत्रावर यांच्या स्वाक्षरी आहे .
जिल्हा परिषद सदस्य व खेडयापाडयातील व दुर्गम भागातील नागरीकांचे विकासात्मक दृष्टीकोण व ग्रामीण पातळीवर सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असुन त्याची जाणीव ठेवुन जिल्हापरिषद सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे .
शासनाकडुन येणाऱ्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होवून कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकिय कामांत दैनंदीन येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडविण्याच जिला परिषद संघटनेकडुन प्रश्न सोडविला जाणार असल्याची माहीती जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी दिली.
जिल्हा परिषद सदस्य असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावेर यावल आ.शिरीष चौधरी ( महाराष्ट्र प्रदेश कँग्रेस कमिटी ). उल्हास पाटील .( प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष ) संदीप भैय्या पाटील ( कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष जळगांव ) भगतसिंग पाटील (जिल्हा अध्यक्ष इंटक ), माजी आ . रमेशदादा चौधरी, हाजी शब्बीर खान ( जिल्हा उपाध्यक्ष कॉग्रेस ), वसंत रामजी महाजन (माजी प्रतोद कॉग्रेस ), जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील . सौ . सुरेखाताई पाटील, पं .स . चे माजी सभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी, बामणोद चे माजी सरपंच शिवराम किसन तायडे ., पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंस सदस्य -सरफराज तडवी, सौ . कालिमा तडवी, कृउबा माजी सभापती नितीन व्यंकट चौधरी, यावल न पा गटनेता सय्यद युनुस सय्यद युसुफ , फैजुर गट नेता नपा कलीम मन्यार, काँग्रेसचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान, माजी सभापती उपसभापती उमाकांत रामराव पाटील फैजपुर शहर काँग्रेस अध्यक्ष रियाज भाई यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.
जळगाव जिल्हा परिषद चे एकुण ६७ सदस्य व जिल्ह्यात १३४पंचायत सदस्य असुन, असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदी माझ्यावर जी जबाबदारी संघटनेने सोपवली असून ती जबाबदारी पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेल सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेवुनआवाज उठून निश्चीत प्रयत्न करू आणि या संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना नगरसेवक संजूभाऊ वाडे यांच्यासह सर्वांचेच त्यांनी आभार व्यक्त केले आहे